गाडगे बाबा जयंती — स्वच्छतेतून सुधृढ सार्वजनिक आरोग्य
संत गाडगे बाबा यांनी स्वतःचे जीवन स्वच्छतेतून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी वाहून घेतले. त्यांनी सुरु केलेले काम, गांधीजींचा स्वच्छतेबाबत आग्रह आणि मागील सात वर्षांपासून असलेला भारत सरकारचा स्वच्छतेचा उपक्रम यामुळे नक्कीच स्वच्छतेचा स्तर उंचावला आहे.
आपल्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांपासून प्रेरणा घेऊन श्री. आर आर पाटील (आबा) यांनी ग्रामस्वच्छतेचा खूप मोठा उपक्रम राबवला आणि महाराष्ट्रातील खेड्यांमधील स्वच्छतेची स्थिती सुधारली. आज हीच खेडी सांडपाणी आणि घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सोशल लॅब चे काम खूप अंशी गाडगे महाराजांच्या विचारापासून प्रेरित आहे. आबा नि राबविलेल्या अभियानाचा सुद्धा त्याला हातभार आहे आणि स्वच्छ भारत अभियानामुळे एक उद्योग म्हणून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याची ताकत मिळते.
स्वच्छतेतून सार्वजनिक आरोग्य प्रत्यक्षात येण्यासाठी आणखीन खूप काम करण्याची गरज आहे. विशेषतः कचरा प्रक्रिया, त्याची योग्य विल्हेवाट, नियमित कचरा कर संकलन, सफाई कर्मचारी आणि कचरा वेचक यांना सोयी या बाबींवर विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे आहे. तितकेच महत्वाचे म्हणजे खाजगी कंपन्यांनी त्यांच्यामुळे होणाऱ्या पर्यावरण प्रदूषणाची जबाबदारी ओळखून पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे अत्यावश्यक आहे. यापुढे केवळ नावापुरते किंवा बंधने आहेत म्हणून पर्यावरण संरक्षणाचा देखावा करणे आपल्या कुणालाही परवडणारे नाही.
आज गाडगे महाराजांच्या जयंती निमित्त त्यांनी दिलेला संदेश सोशल लॅब प्रामाणिकपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे..