C&D कचरा व्यवस्थापनाचे महत्व आणि सर्वेक्षणात बदलत असलेली भूमिका
बांधकाम आणि मोडतोड (C&D) कचरा म्हणजे कोणत्याही नागरी संरचनेचे बांधकाम, रीमॉडेलिंग, दुरुस्ती किंवा पाडतोड यामुळे निर्माण होणारा कचरा होय. यामध्ये बांधकाम साहित्य, मोडतोड आणि ढिगाऱ्यांचा समावेष होतो. बांधकाम क्षेत्राच्या प्रचंड वाढीमुळे C&D कचऱ्याचे प्रमाण शहरांमध्ये अतिवेगाने वाढत आहे ज्यामुळे C&D कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. तथापि, बर्याच स्थानिक स्वराज्य संस्थामधील सध्याच्या C&D कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत जसे की C&D कचरा संकलनाचा अभाव, ऑन साइट वर्गीकरणाचा अभाव आणि C&D कचरा पुनर्वापर व रिसायकलिंगचे अत्यंत तुटपुंजे प्रमाण.
C&D कचऱ्याचे घटक
C&D कचऱ्यामध्ये सामान्यत: माती आणि रेव (३६%), वीट आणि दगडी बांधकाम (३१%), काँक्रीट (२३%), धातू (५%) आणि बिटुमेन (२%) या प्रमाणात आढळते.
C&D कचरा व्यवस्थापन का महत्वाचे आहे?
1)शहराचे वातावरण सुधारण्यासाठी
C&D कचऱ्याच्या धूलिकण पासून वायू प्रदूषण होते, तसेच जलकुंभ मध्ये कचरा टाकल्यास जलप्रदूषण होते. याचबरोबर बहुतंशः C&D कचरा हा लँडफिलमध्ये जात असल्या कारणामुळे जमिनीची पुरेशी जागा व्यापली जाते जी इतर कारणांसाठी वापरली जाऊ शकते. या अनुषंगाने C&D कचरा व्यवस्थापन केल्यास वायू आणि जल प्रदूषण कमी होऊन शहराचे वातावरण सुधारण्यास आणि लँडफिलमध्ये जाणारा कचरा कमी करण्यास मदत होईल.
2)कायदेशीर पालन (लीगल कम्प्लायंस) सुनिश्चित करण्यासाठी
“C&D कचरा व्यवस्थापन नियम २०१६” हे C&D कचऱ्यासाठीचे भारतातील सर्वांगीण नियमन आहे जे नागरी स्थानिक संस्था, कचरा निर्माते (जनरेटर), सेवा प्रदाते आणि त्यांचे कंत्राटदार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादींसह संबंधित भाग धारकांसाठी विशिष्ट जबाबदाऱ्या अनिवार्य करते. त्यामुळे C&D कचरा व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे स्थानिक स्वराज्य संस्थाना कायदेशीर अनुपालन साध्य करण्यात मदत करतात.
3)SS स्कोअर सुधारण्यासाठी
C&D कचरा व्यवस्थापनाला स्वच्छ सर्वेक्षण २०२३अंतर्गत लक्षणीय वेटेज देण्यात आले असून त्याचा वाटा सर्टिफिकेशन (GFC स्टार रेटिंग) अंतर्गत १२% आणि SLP अंतर्गत २.६५% आहे. विशेष म्हणजे, GFC स्टार रेटिंग अंतर्गत C&D कचऱ्यावर 4 निर्देशक आहेत ज्यात C&D कचरा-संकलन, C&D कचरा वर्गीकरण, C&D कचरा-प्रक्रिया आणि पुनर्वापर आणि C&D कचरा- सामग्रीचा वापर यांचा समावेश आहे.
C&D कचरा व्यवस्थापनाचे फोकस एरिया: C&D कचरा व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
· १००% C&D कचरा संकलन
· ऑन -साइट कचरा वर्गीकरण (किमान बल्क वेस्ट जनरेटर (BWGs) द्वारे)
· C&D कचऱ्याचा पुनर्वापर आणि रिसायकलिंग साठी उपाय योजना
· C&D कचरा कमी करणे (बांधकाम डिजाईन मधील बदला द्वारे)
· C&D कचरा मूल्यांकन आणि देखरेख प्रणाली
याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये मांडणार आहोत.
आपणास काही शंका किंवा सूचना असल्यास, कृपया श्री कुणाल ठाकूर (+91–9960479785) यांच्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला kunal@social-lab.in वर ईमेल पाठवा.
सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थापन कंसल्टंट कंपनी आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये — सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.
आमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला (www.social-lab.in) भेट द्या आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).