खिळे मुक्त वृक्ष-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक नाविन्यपूर्ण उपक्रम.

Social Lab
3 min readJul 9, 2021

निसर्गऋण म्हणजे निसर्गाचे आपल्यावर असलेले कर्ज. निसर्ग आपल्याला दोन्ही हाताने
भरभरून देत असतो. हवा, प्रकाश, पावसाचे पाणी, फळे-फुले सर्व फुकट! परंतु आपण ते कोणत्या स्वरूपात निसर्गाला परत करतो? खरंतर निसर्गातून आपण जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती जिवन जगण्यासाठी घेतो ती साधनसंपत्ती काटेकोर पणे वापरायला हवी. याच उद्देशाला अनुसरून 5 जून 2021 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक नाविन्यपूर्ण उपक्रम करायचे बऱ्याच दिवसापासून ठरवले होते आणि मी ज्या उद्योग समूहात गेल्या दोन वर्षापासून काम करतो सोशल लॅब एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स प्रा. लिमिटेड औरंगाबाद ही संस्था अर्थात कचरा व्यवस्थापन करून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करते.

त्याचाच एक भाग म्हणून मी वृक्षांना ही खिळे मुक्त करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा
ध्यास हाती घेतला. हा विचार माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून वाचन करून आला होता
आणि त्या विचारांवर काम करण्यासाठी मला शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साहेब प्रशांत बिडगर सर,इंजिनीयर, सत्यम पाटील सर यांनी मला हा उपक्रम राबवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मार्गदर्शन करून सहकार्य केले. त्यामध्ये आम्ही अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबवला ज्यात आम्ही कडू लिंबाच्या बिया पासून 1000 सीड बॉल तयार करून 5 जून 2021 ला पाच विविध ठिकाणी ज्यामध्ये 2 कब्रीस्थान व 3 बगिच्यांमध्ये प्रत्येकी दोनशे — दोनशे असे एकूण एक हजार सीड बॉल तयार करून लावण्यात आले आहे.

मी खूप ठिकाणी बघितले आहे व ऐकले की याठिकाणी एवढे वृक्ष लागवड केली, त्यांना लहानाचे मोठे लहान मुलासारखे संगोपन करून केले. तर, हो वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. परंतु, हीच वृक्ष मोठी झाल्यानंतर शहरांमध्ये या वृक्षांचा वापर हा जाहिराती लावण्यासाठी केला जातो. मग त्या पोस्टर मध्ये खिळे तार घालून वृक्षांना ठोकले जाते. जगदीश बसू या भारताच्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की, झाडांनाही वेदना होतात, संवेदना असतात, झाडे ही हसतात मग तुम्हीच सांगा झाडाला खिळे ठोकणे हे कितपत योग्य ? त्यांनाही जीव आहे, जर आपल्याला एखादी छोटी सुई जरी टोचली तर आपल्याला किती त्रास होतो त्याच प्रमाणे झाडांचा देखील जीव आहे. झाडांना जरका खिळे ठोकली तर झाडे ही आजारी पडत असतात आणि मग त्या झाडांचे पाने ही गळायला लागतात त्यानंतर ते
झाड सुकू लागते व त्या झाडांची वय ही कमी — कमी होत जाते म्हणून जे कोणी आपली जाहिरात ही वृक्षाला खिळे तार बांधून करत असेल तर त्यांनी कृपया आजपासून वृक्षांना खिळे व तार बांधून जाहिरात करणे थांबवावे. पुणे, मुंबई सारख्या सुशिक्षित शहरात वृक्षांना जाहिराती, बॅनर व होंर्डिंग लावलेल्या असतात. हा गाळा विकणे आहे, या ठिकाणचा प्लॉट पाच लाख रुपये गुंठा ने मिळेल, आमच्याकडे I.A.S. व I.P.S. बनवून मिळतील अशा जाहिराती ह्या लावलेल्या असतात. ज्या आपल्या शिक्षणात आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवता येईल हे शिकवले जाते आणि त्याच शिक्षणाची जाहिरात आपण वृक्षांना खिळे तार बांधून करत आहोत. म्हणून हे कुठेतरी आता थांबले पाहिजे. यासाठी मी एक छोटा प्रयत्न करून शिंदखेडा शहरातील 29 वृक्षांचे 69 खिळे काढून त्या वृक्षांना खिळे मुक्त केले आहे. यात माझी शिंदखेडा शहराची सोशल लॅब टीम : गौतम बोरसे, प्रदीप पाटील, आकाश ठाकरे, व गणेश पवार यांनीही खूप मोलाचे सहकार्य केले आहे. व आम्ही सर्वांनी या छोट्याशा प्रयत्नातून 29 वृक्षांना खिळे मुक्त करून पर्यावरणाचे संवर्धन केले आहे. हे करून मला खूप समाधान वाटते.

लेखन : किरण लोंढे, कोऑर्डिनेटर, सोशल लॅब

Read the same blog in English, here.

Social Lab Environmental Solutions is a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products. Brands take our services to fulfill Extended Producer Responsibility (EPR) obligation under Plastic Waste Management Rules, 2018.

Our Social Media

LinkedIn- https://tinyurl.com/4s3qsav4

Instagram- https://tinyurl.com/cai697bb

Facebook- https://tinyurl.com/uwsrxfcr

Twitter- https://tinyurl.com/kqse5yk1

Pinterest- https://tinyurl.com/nu3w9uv9

--

--

Social Lab

We are a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products.