देवळाली प्रवरा येथे लोकसहभागातून (PRA द्वारे) कचरा व्यवस्थापन
देवळाली प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटी नगरपालिका आहे. येथे जानेवारी २०२३ मध्ये, सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला IEC (माहिती, शिक्षण आणि संप्रेषण) कन्सल्टन्सी एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले. तेव्हापासून, एजन्सी परिसरातील कचरा व्यवस्थापन समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध BCC (वर्तणूक बदल संप्रेषण) आधारित जागरूकता उपक्रम राबवत आहे. यातील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक म्हणजे सहभागी ग्रामीण मूल्यमापन (PRA) ची अंमलबजावणी, ज्यामध्ये सोशल लॅब टीमने देवळाली प्रवरा येथील रहिवाशांना गुंतवून घनकचरा प्रणालीतल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.
या अनुषंगाने शहरातील ३ ठिकाणी PRA पद्धती राबविण्यात आली ज्यामध्ये ७५ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
PRA अंतर्गत खालील उपक्रम क्रमनिहाय राबविण्यात आले :
1. बेसलाइन सर्वे
घनकचरा व्यवस्थापनाचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी जागेचा बेसलाइन सर्वे करण्यात आला ज्यामध्ये कचरा संकलन, वर्गीकरण , कचराकुंड्या (GVP), व सफाई कर्मचारी कपॅसिटी बिडलिंग इत्यादी बाबींच्या सद्य परिस्थिती व त्रुटींबद्दल माहिती घेण्यात आली. हे IT मॉनिटरिंग, प्रत्यक्ष निरीक्षण व डेटा विश्लेषणाद्वारे केले गेले.
2. समुदाय गट तयार करणे
त्यानंतर समस्येबद्दल जागरुकता निर्माण करून आणि त्याचे निराकरण करण्यासाठी स्थानिक रहिवासी, कचरा वेचक आणि इतर प्रभावित भागधारकांचे समुदाय गट तयार करण्यात आले.
3. एरियाचे मॅपिंग आणि प्रोफाइलिंग
समुदाय गटाच्या साह्याने लोकांना एका मोकळ्या ठिकाणी एकत्र करण्यात आले आणि लोकसहभागाने जागेचा नकाशा बनविण्यात आला. यामध्ये जागेचे प्रकार, तेथील समस्या व त्यांची कारणे अधोरेखित करण्यात आली.
4. स्थानिक समस्या ओळखणे
वरील टप्प्याच्या माध्यमातून स्थानिक समस्या ओळखण्यात आल्या जसे की घंटागाडीची अयोग्य वेळ, कचरा उघड्यावर फेकण्यात येणाऱ्या व जाळण्यात येणाऱ्या ठिकाणांची माहिती, नाल्याच्या व शौचालयाच्या स्वच्छतेचा अभाव इ.
5. लोकसहभागातून समस्यांचे निराकरण
आढळलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खालील उपाय योजना राबविण्यात आल्या.
a) स्वच्छता ऍप वर तक्रारी नोंदविणे: ८
b) कचराकुंड्यांचे (GVPs) उच्चाटन: ६
c) जनजागृती चे मुख्य उपक्रम -
- कचरा वर्गीकरणाचे डेमो: o५
- स्टिकर वाटप (कचरा वर्गीकरण & होम कंपोस्टिंग): ३४९
- ई-प्लेज प्रमाणपत्र डाउनलोड: ७३५
सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थान कंसल्टंट कंपनी आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये — सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.
आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या (www.social-lab.in) आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).
लेखक: कुणाल ठाकूर (व्यवस्थापक) व अनिरुद्ध पांडव (व्यवस्थापक) , सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लि.