प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा (comprehensive action plan)
स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ टूलकिट अंतर्गत प्रत्येक ULB ला प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी एक सर्वसमावेशक कृती आराखडा बनवणे आवश्यक आहे. यासाठी एसएलपी स्कोर अंतर्गत ३.३१% हिस्सा प्रदान करण्यात आला आहे.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठीच्या सर्वसमावेशक कृती आराखड्यात खालील ५ घटकांचा समावेश असावा.
०१: प्लास्टिक कचऱ्याचे मूल्यांकन (स्त्रोत व प्रकारांनुसार)
- एकूण सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण किती आहे?
- विविध स्त्रोत निहाय आणि प्रकारांनुसार प्लास्टिक चे प्रमाण किती आहे?
- अनौपचारिक क्षेत्राद्वारे (कचरा वेचक व अनौपचारिक भंगार विक्रेते) किती प्लास्टिक हाताळले जाते?
०२: एकेली वापर (Single use) प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी
- जप्त केलेले प्लास्टिक व दंड वसूल केलेली रक्कम किती आहे?
- एकेली वापर (Single use) प्लास्टिकला कोणते पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत अथवा दिले जातील?
- एकेली वापर (Single use) प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी भविष्यातील धोरण काय आहे?
०३: प्लास्टिक कचरा जनजागृती (IEC)
- कोणते IEC उपक्रम राबविण्यात आले आहेत आणि प्रस्तावित आहेत?
- जाहिरात (promotion) करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा केला जातो?
- किती क्लीन-अप ड्राईव्ह राबविण्यात आले आहेत आणि प्रस्तावित आहेत?
०४: कचरा वेचक आणि भंगार विक्रेत्यांचे औपचारिकीकरण
- तुम्ही शहरातील भंगार विक्रेते आणि कचरा वेचकांचे मॅपिंग केले आहे का?
- तुम्ही कोणत्या सामाजिक लाभ योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाल?
o५: प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (PWM) फॅसिलिटी ची स्थापना
- निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा डेटा कसा राखला जातो व मॉनिटरिंग कशी केली जाते?
- प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुमची योजना काय आहे?
- तुम्ही रिसायकलर्स किंवा कचरा व्यवस्थापन एजन्सीशी जुडले आहात का?
- तुम्ही EPR अंतर्गत कंपन्यांबरोबर काम करता का?
यासंदर्भात आपणास काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया श्री. कुणाल ठाकूर यांना (+९१–९९६०४७९७८५) या क्रमांकावर किंवा kunal@social-lab.in या ई-मेल ID वर संपर्क साधावा.
सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थान कंसल्टंट कंपनी आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये — सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.
आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या (www.social-lab.in) आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).
लेखक: सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड येथील श्री. अनिरुद्ध पांडव (व्यवस्थापक) आणि श्री राहुल जुवारे (संचालक)