बारामती मध्ये होम कंपोस्टिंग चे इनोव्हेशन (बायो-लिक्विड कंपोस्टर द्वारे)

Social Lab
2 min readApr 21, 2023

--

होम कंपोस्टिंग हे विकेंद्रित ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे सर्वात प्रभावी साधन आहे. सामान्यतः, होम कंपोस्टिंग मध्ये ओल्या कचऱ्याचे ड्रम किंवा खड्डा किंवा बास्केट मध्ये एरोबिक पद्धतीने विघटन केले जाते. तथापि, यामध्ये वापरकर्त्याला कचऱ्याच्या वासाच्या समस्या, कीटकांचे वाढते प्रमाण आणि कचऱ्याला नियमित ढवळण्याची आवश्यकता इत्यादी समस्या येत असल्यामुळे होम कंपोस्टिंग चा वापर मर्यादित आहे.

त्यामुळे, या समस्यांना सोडवण्यासाठी बारामती नगरपरिषदेने बायो-लिक्विड कंपोस्टरचा वापर करून अन-एरोबिक पद्धतीने होम कंपोस्टिंग करण्याचा अभिनव दृष्टिकोन अवलंबला आहे. यासाठी नगरपरिषदेला सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड , या कन्सल्टन्सी एजन्सी चे सहाय्य प्राप्त झाले आहे. या पद्धतींतर्गत, वापरकर्त्याला दररोज बंद कंटेनरमध्ये ओला कचरा आणि पाणी यांचे निश्चित प्रमाण टाकणे आवश्यक आहे, मात्र बायो कल्चर केवळ सुरुवातीला मिक्सिंगसाठी वापरावे लागते. असे रोज केल्यानंतर, २५ दिवसानंतर दररोज लिक्विड कंपोस्ट प्राप्त होऊ शकते जे पाण्यात मिसळून बागेतील झाडांसाठी खत म्हणून वापरण्यास योग्य आहे.

प्रकल्प अंतर्दृष्टी

या प्रकल्पांतर्गत सर्वांगीण दृष्टीकोन अवलंबला गेला, आणि जागरुकता व प्रशिक्षण, इन्स्टॉलेशन सहाय्य आणि दैनंदिन देखरेख यावर भर देण्यात आला. यामध्ये शहरातील ५oo घरांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ५o घरे समाविष्ट करण्यात आली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, २०० लिटर लिक्विड कंपोस्ट आतापर्यंत तयार झाले असून घरगुती बागेमध्ये वापरण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत राबविलेले उपक्रम आणि परिणाम खाली दर्शविण्यात आले आहेत.

लेखक: अनिरुद्ध पांडव (व्यवस्थापक) , सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लि.

सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थान कंसल्टंट कंपनी आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये — सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.

आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या (www.social-lab.in) आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).

--

--

Social Lab
Social Lab

Written by Social Lab

We are a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products.

No responses yet