बारामती येथील अभिनव प्रकल्प: आदर्श बल्क वेस्ट जनरेटर (BWGs) विकसित करणे
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार, “बल्क वेस्ट जनरेटर (BWG)” म्हणजे दररोज सरासरी १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणारी कोणतीही संस्था. यामध्ये सामान्यत: सोसायटी, शाळा, हॉटेल्स, रुग्णालये, विवाह हॉल इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्याकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या अधिक प्रमाणामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणाली सुधारण्यात BWGs महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
या अनुषंगाने, बारामती नगरपरिषद शहरात आदर्श BWG विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प राबवत आहे ज्या अंतर्गत शाश्वत कचरा व्यवस्थापन पद्धती अंमलात आणल्या आहेत. हा प्रकल्प सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कन्सल्टिंग एजन्सीच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा कालावधी ४ महिन्यांचा असून (मार्च ते जून) यामध्ये शहरातील २२ BWGs समाविष्ट आहेत.
या प्रकल्पाविषयीची संक्षिप्त माहिती खाली देण्यात आली आहे.
राबविलेले उपक्रम
प्रकल्पाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, खालील उपक्रम क्रमशः हाती घेण्यात आले.
- SOPs तयार करणे
सुरुवातीला, CPHEEO मार्गदर्शक तत्त्वे आणि SBM टूलकिट नुसार प्रत्येक प्रकारच्या BWG साठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस (SOPs) तयार करण्यात आल्या. त्याद्वारे प्रत्येक प्रकारच्या BWG अनुसार शाश्वत घनकचरा पद्धती दर्शविण्यात आल्या.
- जागरूकता आणि प्रशिक्षण सत्र
त्यानंतर, SOP च्या अंमलबजावणीसाठी जागरूकता आणि प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली ज्यामध्ये व्यवस्थापन आणि प्रशासकीय कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला.
- पोस्टर्स आणि स्टिकर्स लावणे
शाश्वत घनकचरा पद्धतींचा संदेश देण्यासाठी भिंतींवर पोस्टर्स आणि स्टिकर्स लावण्यात आले.
- कंपोस्ट आणि बायोगॅस च्या इन्स्टॉलेशन आणि ऑपरेशनमध्ये तांत्रिक सहाय्य
ऑन-साइटवर ओल्या कचऱ्याची प्रक्रिया साध्य करण्यासाठी २ हॉटेलांनी बायोगॅस युनिट इन्स्टॉल केले तर ५ शाळांनी कंपोस्टिंग पीट बनविले. यामध्ये त्यांना इन्स्टॉलेशन आणि ऑपरेशनमध्ये तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
- रिसायक्लेबल प्लास्टिकच्या विक्रीसाठी मार्केट लिंकेज स्थापित करणे
रिसायक्लेबल प्लास्टिकच्या विक्रीसाठी BWGs चे भंगार विक्रेत्यांबरोबर मार्केट लिंकेज स्थापित करण्यात आले ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळू शकले.
- नियमित देखरेख
BWGs द्वारे सुचविलेल्या घनकचरा पद्धती राबविल्या जातात की नाही व त्यांच्या समस्या जाणण्यासाठी नियमित देखरेख केली जाते.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया श्री. कुणाल ठाकूर यांना (+९१-९९६०४७९७८५) या क्रमांकावर किंवा kunal@social-lab.in या ई-मेल ID वर संपर्क साधावा. अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शहरात राबवण्यासाठी आपणास सहाय्य करण्यासाठी आम्हाला आनंद होईल.
लेखक: अनिरुद्ध पांडव (व्यवस्थापक, सोशल लॅब) आणि किरण लोंढे (टीम लीड, सोशल लॅब)
घनकचरा व्यवस्थापनातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला (www.social-lab.in) भेट द्या आणि आम्हाला सोशल मीडिया (https://linktr.ee/Social_Lab) ला फॉलो करा.