राहुरी येथील नाविन्यपूर्ण प्रकल्प - घनकचरा प्रक्रिया केंद्रावर विद्यार्थ्यांचा ‘अभ्यास दौरा’

Social Lab
4 min readMay 10, 2023

--

राहुरी शहराने घनकचरा व्यवस्थापनामध्ये साध्य केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये राहुरी नगर परिषदेने देशात १४ वा तर राज्यात १२ क्रमांक मिळवला असून त्याचबरोबर जी.एफ.सी. ३- स्टार रेटिंग आणि ओ.डी.एफ.++ नामांकन प्राप्त केले आहे.

या सर्वांची सुरुवात झाली ती म्हणजे कचरा प्रक्रिया केंद्राच्या स्थापनेपासून ज्यामध्ये मा. माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे आणि मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे. राहुरी शहरात दररोज १४ टन घनकचरा तयार होतो. पूर्वी हा सर्व कचरा मिक्स स्वरुपात डम्प केला जात असे. त्यामुळे कचऱ्याचे मोठे मोठे ढीग साचत होते ज्याद्वारे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होत होते व तसेच कचऱ्यामध्ये आग लागत होती. या कारणास्तव, शेतकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता.

ही समस्या सोडविण्यासाठी मा. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनि अद्यावत प्रक्रिया केंद्राद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यासाठी कचऱ्याचे वर्गीकृत संकलन होणे अत्यंत आवश्यक होते म्हणून जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी नगर परिषदे सोबत, सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ही घनकचरा व्यवस्थापन कन्सल्टंट एजन्सी कार्यरत आहे. या अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांचे परिणाम स्वरूप म्हणून राहुरी शहरामध्ये वर्गीकृत कचरा संकलन व कचराकुंड्यांचे उच्चाटन झालेले दिसून येत आहे आणि कचरा प्रक्रिया केंद्र हे एक स्वच्छ व शोभनीय स्थान झाले आहे.

या अनुषंगाने हा सकारात्मक परिणाम दर्शविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापना विषयी जागृती व क्षमता बांधणी करण्याच्या उद्देशाने राहुरी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांचा घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे ‘अभ्यास दौरा’ आयोजित करण्यात आला. यासाठी माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे आणि मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमामध्ये खाली दिल्याप्रमाणे सर्व भागधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  • विद्यार्थी: एकूण १३ शाळांमधील ९४४ विद्यार्थी
  • नगरपरिषद: मुख्याधिकारी व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी (एकूण २०)
  • लोकप्रतिनिधी: माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी; माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे; नगरसेवक व नगरसेविका: o५
  • शिक्षण कर्मचारी: गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी (३०)
  • प्रक्रिया केंद्र येथील कर्मचारी: (१५)
  • सोशल लॅब टीम (१३)
  • इतर उपस्थित नागरिक (२५)

कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम

या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले ज्यामध्ये प्रशिक्षण व्याख्यान, प्रक्रिया केंद्राची व्हीजिट, क्षमता बांधणीसाठीचे खेळ, बक्षीस वितरण, पथनाट्य सादरीकरण व नागरिकांचा फीडबॅक घेणे इत्यादी समाविष्ट आहेत. याविषयीची विस्तृत माहिती खाली देण्यात आली आहे.

  • प्रशिक्षण व्याख्यान व प्रक्रिया केंद्राची विजिट

मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना घनकचरा प्रकल्प येथे कार्यरत सर्व प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर सर्व उपस्थित समुदायाला माननीय खासदार प्रसादरावजी तनपुरे यांनी अभिभाशीत केले. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्याचे महत्त्व सांगितले तसेच स्वच्छतागृहाचा वापर करणे, झाडे लावणे, सेंद्रिय खत वापरण्याचे आणि प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, पात्रावळी न वापरल्याचे आवाहन केले.

यानंतर प्रक्रिया केंद्राची व्हिजिट करण्यात आली, आणि ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धती दर्शविण्यात आली. यामध्ये शहरातील घंटागाडी मार्फत वर्गीकृत येणाऱ्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत प्रक्रिया पद्धत तसेच सुक्या कचऱ्याचे प्रकारानुसार वर्गीकरण करण्यात येऊन प्लास्टिक कचऱ्याचे प्लास्टिक बेलिंग मशीन द्वारे बिलिंग करून त्याची विक्री करण्यात येते, याची माहिती सांगितली. यावेळी मुख्याधिकारी यांनी कचरा घंटागाडीत देताना ओला सुका याप्रमाणे वर्गीकरण करून द्यावा. विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजावून घ्यावे व रोज घंटागाडीलाच कचरा द्यावा असे आवाहन केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्याधिकारी यांनी उत्तर दिले.

  • क्षमता बांधणीचे खेळ आणि बक्षीस वितरण

घनकचरा व्यवस्थापना विषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्यासाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले. यामध्ये कचरा वर्गीकरणाची सापसीडी, संगीत खुर्ची, अप डाऊन, जिलेबी, सामोसा, डोसा नावाचा खेळ इ. खेळ घेण्यात आले. सदर खेळामधील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देखील देण्यात आले.

  • पथनाट्य सादरीकरण

घनकचरा व्यवस्थापना विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य देखील सादर करण्यात आले. यामध्ये विशेष भर कचरा वर्गीकरण व सार्वजनिक मालमत्ता संवर्धन या विषयांवर देण्यात आला. यासाठी सोशल लॅब टीम चे विशेष सहाय्य लाभले.

  • उपस्थित नागरिकांचा फीडबॅक घेणे

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांचा फीडबॅक घेण्यात आला ज्यामध्ये त्यांना येणाऱ्या समस्या, व प्रस्तावित उपाय योजना जाणून घेण्यात आल्या.

कार्यक्रमामुळे साध्य झालेले परिणाम

राहुरी नगर परिषदेने राबवलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम जनजागृती व क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने खूपच प्रभावशाली ठरला. शहरातून दैनंदिन रित्या संकलित होणाऱ्या कचऱ्यावर नगरपरिषद कशाप्रकारे प्रक्रिया करते हे विद्यार्थ्यांना अवगत झाले. तसेच प्रक्रिया केंद्राचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यास व प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले. मुलांना ओला — सुका — हानिकारक कचरा व घरगुती घातक कचरा या विषयी माहिती मिळाली व कचऱ्याचे महत्त्व पटले.

हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन श्री दत्तात्रय जाधव आणि सोशल लॅब टीमच्या सर्व प्रतिनिधींचे सहकार्य लाभले.

लेखक: डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी, राहुरी नगर परिषद

सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थान कंसल्टंट कंपनी आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये — सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.

आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या (www.social-lab.in) आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).

--

--

Social Lab
Social Lab

Written by Social Lab

We are a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products.

No responses yet