समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण टाळण्यासाठी ULB ची भूमिका

Social Lab
3 min readFeb 1, 2023

--

समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण हे आपल्या पृथ्वीसमोरील हवामान बदल (Climate Change) सारखेच गंभीर आव्हान आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे की समुद्रातील कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे सुमारे ८०% प्रमाण आहे ज्यामुळे सागरी प्रजाती, समुद्री खाद्य सुरक्षा, मानवी आरोग्य, किनारी पर्यटन आणि सागरी परिसंस्था (ecosystem) धोक्यात येत आहे. २०२१ पर्यंत, पृथ्वीवरील समुद्रांमध्ये किमान ३६३.७६ अब्ज पौंड इतके प्लास्टिक आहे — जे पृथ्वीवरील संपूर्ण किनारपट्टीला व्यापून टाकण्यासाठी पुरेसे आहे. प्लास्टिक कचऱ्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे शहरातील नाल्या व पाणवठ्ठ्यांमधील रन ऑफ, उघड्यावर पडलेला कचरा (dark spots) आणि अपर्याप्त कचरा संकलन.

समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या असली तरी ती सोडवण्यासाठी शहर पातळीवरील उपाय योजना आवश्यक आणि प्रभावी आहेत. त्यामुळे ULB ने खालील उपाययोजना करून समुद्रातील प्लास्टिक कमी करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.

  • सिंगल युज प्लास्टिक (SUP) बंदीची अंमलबजावणी

समुद्रातील प्लास्टिक मध्ये जास्तीत जास्त समावेश सिंगल युज प्लास्टिक उत्पादनांचा असतो जसे की कॅरी बॅग, स्ट्रॉ, प्लेट्स, कटलरी इ. म्हणून, SUP बंदीची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे ज्यामध्ये प्रभावी देखरेख यंत्रणेद्वारे बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची जप्त करून दंड आकारण्यात आला पाहिजे.

  • शून्य-कचरा (Zero-waste) कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे

सामूहिक कार्यक्रमांमधील प्लास्टिक वस्तूंचा जास्त वापर लक्षात घेता या कार्यक्रमांना शून्य-कचरा इव्हेंट्स बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी तयार केलेल्या SOP ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

  • IEC द्वारे जागरूकता निर्माण करणे

लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) मोहिम राबविणे खूप महत्त्वाचे ठरते. यामध्ये प्लास्टिकच्या हानिकारक परिणामांबद्दल तसेच प्लास्टिकच्या पर्यावरणपूरक पर्यायांविषयी (जसे की स्टील, काच, कापडी आणि कागदी उत्पादने) माहिती देणे आवश्यक आहे.

  • गटारे आणि जलकुंभांची नियमित स्वच्छता

गटारे आणि जलकुंभांमध्ये पडलेल्या कचऱ्याची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे अथवा हा कचरा नद्यांमार्फत समुद्राला मिळतो.

  • कचराकुंड्यांचे उच्चाटन

कचरा कुंड्यांमधील पडलेला कचरा वारा किंवा पावसाने जवळच्या जलकुंभात वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे, कचराकुंडी असणाऱ्या भागात स्वच्छता जनजागृती मोहीम, देखरेख आणि महत्त्वाचे म्हणजे १००% कचरा संकलन सुनिश्चित करून कचराकुंड्यांचे उच्चाटन करायला पाहिजे.

सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थान कंसल्टंट कंपनी आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये — सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.

आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या (www.social-lab.in) आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).

लेखक: अनिरुद्ध पांडव आणि ईशा बिल्दीकर.

--

--

Social Lab
Social Lab

Written by Social Lab

We are a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products.

No responses yet