सर्वेक्षण २०२४ मध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी जाणून घ्या नवीन टूलकिट मधील बदल
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MOHUA) १० जुलै २०२३ रोजी कचरामुक्त शहरांसाठी (GFC) “रेड्युस रियुज रिसायकल” या थीमसह ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ टूलकिट लाँच केले. विशेष म्हणजे, SS-२४ अंतर्गत फील्ड मूल्यांकन जानेवारी २०२४ पासून सुरू होईल आणि नागरिकांचा अभिप्राय ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होईल. त्यामुळे सर्वेक्षण २०२४ च्या टूलकिट मधील बदल आणि महत्त्वाचे घटक समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
SS-२४ मधील घटकांचा आढावा
SS-२४ स्कोअरमध्ये सर्विस लेवल प्रोग्रेस, सर्टिफिकेशन आणि जन आंदोलन (ज्याला SS-२३ अंतर्गत सिटीझन वॉईस संबोधले गेले) या 3 घटकांचा समावेश आहे.
(*ज्याला SS-२३ अंतर्गत सिटीझन वॉईस संबोधले गेले)
SS-२४ मध्ये SLP अंतर्गत काय बदल झाले आहेत?
उल्लेखनीय बाब म्हणजे, SS-२४ मध्ये SLP अंतर्गत ६ घटकांचा (गेल्या वर्षीच्या ३ च्या तुलनेत) समावेश करण्यात आला आहे, जो SLP कडील अधिक समग्र दृष्टीकोन दर्शवितो.
मुख्य अंतर्दृष्टी
- वर्गीकृत कचरा संकलन आणि वाहतूक, स्वच्छता, वापरलेले पाणी व्यवस्थापन आणि सफाईमित्र सुरक्षा आणि लीगेसी वेस्ट रेमेडिएशन यावरील भर कायम
- दृश्यमान स्वच्छतेला विशेष महत्त्व (१७% हिस्सा)
- ३ नवीन इंडिकेटर्स “दृश्यमान स्वच्छता” या घटका अंतर्गत
— पर्यटन क्षेत्रातील स्वच्छता (२.४५% हिस्सा)
— शाळेतील कचरा व्यवस्थापन व स्वच्छता (१.३१% हिस्सा)
— शून्य येलो स्पॉट्स (१.०५% हिस्सा)
- २ नवीन इंडिकेटर्स “नज इंडिकेटर्स” या घटका अंतर्गत
— RRR (रेड्युस रियुज रिसायकल) केंद्रांचे १ वर्षाचे ऑपरेशन (१.४०% हिस्सा)
— SBM आणि NULM चे कन्वर्जन्स (२.१९% हिस्सा)
SS-२४ मध्ये सिटीझन वॉईस/ जन आंदोलन अंतर्गत काय बदल झाले आहेत?
सर्वेक्षण २०२४ मधील प्रक्रियेतील बदल
SS-२०२४ अंतर्गत इंडिकेटर नुसार स्कोर समजून घेण्यासाठी, कृपया आमच्या या लिंकवर- SS (24) checklist.xlsx तपशीलवार चेकलिस्ट पहा.
आपणास काही प्रश्न किंवा सूचना असल्यास कृपया श्री. कुणाल ठाकूर यांना (+९१-९९६०४७९७८५) या क्रमांकावर किंवा kunal@social-lab.in या ई-मेल ID वर संपर्क साधावा. अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शहरात राबवण्यासाठी आपणास सहाय्य करण्यासाठी आम्हाला आनंद होईल.
घनकचरा व्यवस्थापनातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला (www.social-lab.in) भेट द्या आणि आम्हाला सोशल मीडिया (https://linktr.ee/Social_Lab) ला फॉलो करा.
लेखक: अनिरुद्ध पांडव (लीड कन्सल्टंट ,सोशल लॅब)