स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी जाणून घ्या नवीन टूलकिट मधील बदल
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MOHUA) २४ मे २०२२ रोजी कचरामुक्त शहरांसाठी (GFC) “वेस्ट टू वेल्थ” या थीमसह ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ टूलकिट लाँच केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी च्या तुलनेत यावर्षी टूलकिट खूप आधी पब्लिश करण्यात आले आहे आणि असेसमेंट देखील लवकर (डिसेंबर २०२२ च्या अखेरीस) पूर्ण केले जाईल. त्यामुळे सर्वेक्षण २०२३ च्या टूलकिट मधील बदल आणि फोकस पॉईंट्स समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
सर्वेक्षण २०२३ मध्ये काय बदल झाले आहेत?
सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस (SLP) घटकाचे वाढते प्रमाण:
SLP घटकाला अधिक महत्त्व दिले गेले आहे आणि त्याचे प्रमाण ४०% (SS- २२ मध्ये) वरून ४८% (SS- २३ मध्ये) पर्यंत वाढले आहे, तर सर्टिफिकेशन आणि सिटीझन व्हॉइस घटकांचे प्रमाण किरकोळ कमी झाले आहे.
SLP चे फोकस पॉईंट्स
i) १००% वर्गीकृत कचऱ्याचे संकलन
या घटकाला अधिक महत्व प्राप्त झाले असून त्याचा हिस्सा SLP स्कोअरच्या ३०% (SS- २२) वरून ३९% (SS- २३) पर्यंत वाढला आहे.
ii) कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट
मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील ‘कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट’ वर भर देण्यात आला आहे. SLP स्कोर अंतर्गत त्याचे प्रमाण SS- २३ आणि SS- २२ दोन्हीमध्ये समान असून ते ४०% इतके आहे.
iii) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन
प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे वाढते महत्व लक्षात घायला हवे, कारण SLP स्कोर अंतर्गत त्याचे प्रमाण २% (SS- २२मध्ये) वरून १०% (SS- २३ मध्ये) इतके वाढले आहे. विशेष म्हणजे, काही नवीन घटक देखील यात जोडण्यात आले आहे जसे की:
a)प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा (comprehensive action plan) तयार करणे
b)प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्यासाठीची फँसिलिटी (MRF, प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र इ.) उभारण्यासाठी किमान १ निविदा मंजूर करणे.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन फँसिलिटी अंतर्गत हे सुनिश्चित केले पाहिजे की प्लास्टिक कचऱ्याचे योग्य पद्धतीने रिसायक्लेबल प्लास्टिक आणि नॉन रिसायक्लेबल प्लास्टिक अश्या प्रकारात विलगीकरण करणे शक्य आहे .
c) प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे (शहरात निर्माण होणाऱ्या एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी)
जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी किमान ६१% प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते याची खात्री करणे आवश्यक आहे. प्लास्टिक कचऱ्याची प्रक्रिया वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचऱ्याचे स्त्रोत वर्गीकरण, PWM फँसिलिटी ची स्थापना आणि EPR/PWM एजन्सीद्वारे रीसायकलर्सशी फॉरवर्ड लिंकेज स्थापित करणे आवश्यक आहे.
iv) 3R उपक्रम
3R उपक्रमांवरील भर वाढताना दिसत आहे कारण SLP अंतर्गत त्याचे प्रमाण २% वरून ६.४१% पर्यंत वाढले आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘वेस्ट टू वंडर’ पार्क या नवीन निर्देशकाला समाविष्ट करण्यात आले आहे.
v) झिरो ‘रेड स्पॉट्स’ (सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे)
सार्वजनिक क्षेत्रांच्या साफसफाईच्या अंतर्गत झिरो ‘रेड स्पॉट्स’ (व्यावसायिक/निवासी भागात न थुंकणे) असे एक नवीन निर्देशक समाविष्ट करण्यात आले आहे. याचे SLP मधील प्रमाण १.७६% इतके आहे.
vi) दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालये
दिव्यांगांसाठी अनुकूल सार्वजनिक, सामुदायिक शौचालये आणि मूत्रालये सुनिश्चित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी या निर्देशकांचे प्रमाण ३% वरून ९% पर्यंत वाढले आहे.
सिटीझन व्हॉइस (CV) अंतर्गत फोकस पॉईंट्स
• स्वच्छ प्रभाग क्रमवारी
स्वच्छ वॉर्ड रँकिंगचे प्रमाण CV घटकाच्या १% वरून १३% पर्यंत वाढले आहे. आणि आता हा कार्यक्रम प्रत्येक माहिन्याआड राबविणे अनिवार्य आहे.
• येल्लो स्पॉट तक्रारीचे निराकरण (उघड्यावर लघवी)
येल्लो स्पॉट (उघड्यावर लघवी) वरील तक्रारींचे निराकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कारण स्वच्छता अँप निर्देशका अंतर्गत त्याचा हिस्सा १०% वरून १८% पर्यंत वाढला आहे.
सर्वेक्षण २०२३ मधील प्रक्रियेतील बदल
SS-२०२३ अंतर्गत इंडिकेटर नुसार स्कोर समजून घेण्यासाठी, कृपया आमच्या या लिंकवर https://bit.ly/SStoolkit2023 तपशीलवार चेकलिस्ट पहा.
आपणास काही शंका किंवा सूचना असल्यास, कृपया श्री कुणाल ठाकूर (+91–9960479785) यांच्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला kunal@social-lab.in वर ईमेल पाठवा.
सोशल लॅब एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स प्रा. ली. ही एक कचरा व्यवस्थापन कंसल्टंट कंपनी आहे,स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर एंड-टू-एंड कन्सल्टिंग सेवा प्रदान करते. आमच्या मुख्य सर्व्हिसेस मध्ये सफाई कर्मचारी कॅपॅसिटी बिल्डिंग, IEC मोहिमेची रचना आणि अंमलबजावणी, सर्वेक्षणासाठीचे डॉक्युमेंटेशन, GPS संकलन मार्ग डिझाइनिंग आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन DPR तयार करणे, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी टेक्निकल कन्सल्टिंग आणि मार्केट लिंकेज प्रदान करणे यांचा समावेश आहे.
आमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला (www.social-lab.in) भेट द्या आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा (https://linktr.ee/Social_Lab).